दिपावली सणाच्या वेळी गांधीनगरमध्ये विजेचे भारनियमण नको-शिवसेनेचे निवेदन
कोल्हापूर : गांधीनगर व्यापार पेठेमध्ये दिवसा व रात्रीच्या वेळेस कोणत्याही प्रकाराने वीज खंडीत होणार नाही याचे योग्य नियोजन करणेत यावे. या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विजय वसंत कोठावळे सहाय्यक अभियंता गांधीनगर विज वितरण कार्यालय यांना दिले.
गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीक, रेडिमेंट आदि जिवनाआवश्यक सर्वच वस्तुंची होलसेल व रिटेल बाजार पेठ आहे. सद्या दिपावली सणाच्या निमित्याने होलसेल खरेदीदारांची तसेच रिटेल खरेदीदारांची वर्दळ सुरू असून बाजार पेठ ही दिपावलीच्या वस्तुंनी सजली आहे. बाजारपेठेत हळु हळु गर्दी होण्यास सुरूवात झाली असून, सद्या आलेल्या शासनाच्या आदेशानूसार व्यापाऱ्यांनी २४ तास दुकाने चालु ठेवून व्यापार करणेस हरकत नाही. असा निर्णय झाल्यामुळे गांधीनगरच्या आसपासच्या गावातील जे रोजंदारी करणारे आता खरेदीसाठी निवांत रात्री येवून खरेदी करणार. तसेच २४ तासाच्या निर्णयानूसार खरेदीदार हा आपल्या वेळेनूसार खरेदी करण्यास येणार त्यामुळे व्यापार पेठेमध्ये सतत दिवसभर व सायंकाळी ही ग्राहकांची वर्दळ बाजार पेठेमध्ये दिसून येणार तसेच दिपावली सणामध्ये रस्त्यावरतीही माल विक्री करणाऱ्या दुकानदारांची ही संख्या मोठी आहे. सदर दुकानातील वीजेच्या उजेडामध्ये रस्त्यावरील विक्रेता आपला व्यापार करत असतो, त्यामुळे गर्दीच्या वेळेस कोणत्याही प्रकारची बाजारपेठेत वीज खंडीत होवू नये याबाबत आपण योग्यती दक्षता घ्यावी ही करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे. तरी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत गांधीनगर बाजारपेठे मध्ये ज्या ज्या ठिकाणी डांबावरती अतिरिक्त लोड मुळे विज खंडीत होणार आहे अशा ठिकाणी आपण जबाबदारीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून घ्यावी जेणे करून गांधीनगर व्यापार पेठेमध्ये दिवसा व रात्रीच्या वेळेस कोणत्याही प्रकाराने वीज खंडीत होणार नाही याचे योग्य नियोजन करणेत यावे.
या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने विजय वसंत कोठावळे सहाय्यक अभियंता गांधीनगर विज वितरण कार्यालय यांना देण्यात आले.
यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, सध्या ऑक्टोंबर हिट असून दीपावली सणामुळे गांधीनगर मध्ये होलसेल व रिटेल खरेदीदारांची रेलचेच सुरू असून अगदी दुकानेही दीपावलीच्या सणाला माल भरून तयार आहेत. रस्त्यावरती ही माल लावणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने संपूर्ण दिवसांमध्ये कोणत्याही वेळेस मग सकाळ असू दे किंवा संध्याकाळ दिवसभरात कोणत्याही वेळेस भारनियमन होऊ नये. ज्या डीपी वरती अतिरिक्त लोड आहे अश्या व्यवसायाच्या ठिकाणी डीपी जवळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. लाईट गेली तरी अगदी कमी वेळेत सूरू व्हावी व खरेदीदारांना व दुकानदारांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये अधिकाऱ्यांनी सतर्क राहून गरजेच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच उंचगावची ही हद्द वीट भट्टी परिसरापर्यंत असल्याने त्याही परिसरामध्ये कोणत्याही प्रकारे विज जाऊ नये अशा पद्धतीचे निवेदन उंचगावच्या वीज वितरण लाही देण्यात आले.
यावेळी अधिकाऱ्यांनी कर्मचारी नियुक्त करून कोणत्याही प्रकारे वीज जाणार नाही आणि गेली तरी तात्काळ दुरुस्ती करू असे आश्वासन शिवसेनेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.
यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, ग्राहक सेनेचे तालुकाप्रमुख जितेंद्र कुबडे, शरद माळी,गांधीनगर शहर प्रमुख दिलीप सावंत, विभाग प्रमुख दीपक पोपटानी, विभाग प्रमुख विनोद रोहिडा, फेरीवाला संघटनेचे तालुकाध्यक्ष कैलास जाधव, गांधीनगर उपशहर प्रमुख दीपक धींग, गांधीनगर उपशहर प्रमुख दीपक अंकल, शाखाप्रमुख सुनील पारपाणी, किशोर कामरा, जितू चावला, बाबुराव पाटील, रामराव पाटील, वसंत पोवार, लालचंद खुबचंदानी आधी शिवसैनिक व व्यापारी उपस्थित होते.
