श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी, घोगाव येथे नवरात्रोत्सवाची सुरुवात

घोगाव (प्रतिनिधी): श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी, घोगाव येथे नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मोठ्या उत्साहात या उत्सवाचा शुभारंभ केला. नवरात्रोत्सवानिमित्त देवीची प्रतिमा स्थापित करून पूजन करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत सांस्कृतिक वातावरणाला उजाळा दिला. नवरात्रोत्सव काळात विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्यांनी दिली.
सर्वांनी एकत्र येऊन नवरात्रोत्सवाचे स्वागत करत देवीचे आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालय परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. पल्लवी ताटे, ज्योती म्होप्रेकर मॅडम व बी फार्मसी तृतीय वर्ष व डी फार्म द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी केले व संस्थेचे सचिव श्री. प्रसून जोहरी आणि प्राचार्य डॉ रामलिंग पत्रकर सरांचे कार्यक्रमास परवानगी दिल्या बद्दल आभार मानले.
