एस. बी. रिशेलर्सचे सचिन शिरगावकर ‘बेस्ट इंजिनियर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित
एस. बी. रिशेलर्सचे सचिन शिरगावकर ‘बेस्ट इंजिनियर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित
कोल्हापूर : इंडियन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन [STAI] यांच्यावतीने शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर – ‘स्मॅक’ चे सदस्य मे. एस. बी. रिशेलर्स चे मॅनेजिंग डायरेक्टर.सचिन शिरगावकर यांना ‘बेस्ट इंजिनियर ऑफ द इयर’ या पुरस्काराने सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. १९२५ साली स्थापन झालेल्या आणि सध्या शताब्दी वर्ष साजरी करत असलेल्या इंडियन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन [STAI] यांच्यावतीने नवी दिल्लीत ‘भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटर’मध्ये आयोजित ८३व्या वार्षिक अधिवेशन व आंतरराष्ट्रीय साखर एक्सपो – २०२५ मध्ये हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.
सचिन शिरगावकर हे कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील सेवा, आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिष्ठित उद्योजक आहेत. ते कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री [सीआयआय], दक्षिण महाराष्ट्र विभागाचे माजी अध्यक्ष आहेत आणि त्यांनी गोशिमा [ गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असोसिएशन] चे दोन वेळा अध्यक्षपद भूषविले आहे. 2007 पासून ते इंडियन फाउंड्रीमेन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन फाउंड्रीमेन [आयआयएफ] चे सक्रिय समिती सदस्य असून त्यांना २०२२-२3 या वर्षात आयआयएफचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले. कोल्हापूर आणि आसपासच्या औद्योगिक आणि प्रशिक्षण क्षेत्रात विकासावर लक्ष केंद्रित करून गोकुळ शिरगाव येथे सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते सध्या आयटीआय, भुदरगड आय टी आयच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी [पीपीपी] उपक्रमाचे अध्यक्ष म्हणून काम करतात. सचिन शिरगावकर हे उगार शुगर वर्क्स लिमिटेड आणि तारा टाइल्स लि. च्या या कंपन्यांचे संचालक आणि पॅव्हेलियन हॉटेलचे व्यवस्थापकिय संचालक आहेत. या व्यतिरिक्त, त्यांच्याकडे युथ को- ऑप. बँकेच्या उपाध्यक्षपदावर विराजमान आहेत. या शिवाय त्यांचा अवनी आणि स्वयंसिद्धा चॅरिटेबल ट्रस्टसह विविध सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमात सक्रीय सहभाग असतो.
