कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्यावतीने कार्यशाळा आणि रोडशो
कोल्हापूर – मुंबईमध्ये आयआयजेएसच्यावतीने ज्वेलरी प्रदर्शन आणि व्यवसायवाढ मार्गदर्शन होणाऱ आहे यासाठी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्यावतीने मंगळवारी (ता. १७) रोजी व्यावसायिक कार्यशाळा आणि रोडशो आयोजित केला आहे.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघ व आयआयजेएसच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल झोरबा येथे मंगळवारी सायंकाळी सात वाजता होणाऱ्या या कार्यशाळेमध्ये ३० जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत मुंबई येथे होणाऱ्या प्रदर्शनासंबंधी सौ. नाहीद सुनके माहिती देतील. यावेळी नोंदणीही केली जाईल. मिथिलेश पांडे जीजेईपीसी व व्यावसायिक संधींवर मार्गदर्शन करतील. यामध्ये व्यवसाय वाढ, ग्राहकांची आवड निवड, भाववाढीतून व्यवसाय, जाहिरात, भांडवल कसे उभे करायचे, इम्पोर्ट-एक्स्पोर्टद्वारे व्यवसाय वाढविणे आदी गोष्टींवर मार्गदर्शन करणार आहेत. डायमंड उद्योगावर इंडियन नॅचरल डायमंड रिटेलर अलायन्सचे श्री. मुलरी मार्गदर्शन करणार आहेत.
याच दरम्यान कोल्हापूर शहरात एक रोड शोही आयोजित केला आहे.
व्यवसाय वाढीच्या दृष्टीने या कार्यशाळेला सराफ व्यावसायिक व सुवर्णकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव शिवाजी पाटील, प्रीतम ओसवाल यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.
