पु.शिरोली गाव हद्दवाढीतून वगळून स्वतंत्र नगरपरिषद करावी : शिवसेना (उबाठा)ची मागणी
शिरोली : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात प्रस्तावित असलेल्या हद्दवाढीमध्ये पुलाची शिरोली या गावचा समावेश न करता, *शिरोली गावची भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन पु.शिरोलीसाठी स्वतंत्र नगरपरिषद मंजूर करावी या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले व मा.आम. डॉ. सुजित मिणचेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाशराव आबिटकर यांना दिले.
यावेळी बोलताना, जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पु.शिरोली गावाची भौगोलिक परिस्थिती व लोकसंख्येचा विचार करता पु.शिरोली गावासाठी स्वतंत्र नगरपरिषद होणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. निवेदनावर बोलताना, ना. प्रकाश आबिटकर यांनी सदरील विषयावर जिल्हास्तरीय बैठकीचे लवकरात लवकर आयोजन करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मा. जि. सभापती प्रवीण यादव, मा. जि. सदस्य महेशभाऊ चव्हाण, मा.ग्रा.पं. सदस्य शिवाजी पाटील , विजयराव पोवार , शिवसेना उ.बा.ठा. पक्षाचे उपशहरप्रमुख अशोक खोत , शाहू दूध डेअरीचे चेअरमन सर्जेराव डांगे, व्हा. चेअरमन सिद्धू पुजारी व इतर ग्रामस्थ तसेच शिरोली गावातील शिवसैनिक उपस्थित होते.
