स्मॅक आयटीआयमध्ये प्रजासत्ताक दिनी विद्यार्थिनींच्या हस्ते झेंडा वंदन
शिरोली : शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर संंचलित स्मॅक आयटीआय मध्ये ७६ व्या प्रजासत्ताक दिनी मुलींच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.
महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने मा. पंतप्रधान यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ ची सुरुवात पानिपत हरियाणा येथे केली होती, त्याला अनुसरून शाळेतील मुलींचा तंत्रशिक्षणामध्ये सहभाग वाढवण्यासाठी प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींचा सहभाग वाढवला आहे.
याचाच एक भाग म्हणून स्मॅक आयटीआय मध्ये मुस्कान तांबोळी, सानवी पाटील, वेदिका पाटील, संचिता कांबळे, रिया गुरव या प्रशिक्षणार्थी मुलींना झेंडा वंदन करण्याचा बहुमान दिला. याचे पालकांंकडूूनही स्वागत करण्यात आले आहे.
तंत्रज्ञानातील निर्मिती करणारे बहुतांश पुरुष असतील तर महिला व त्यांच्या गरजांचा सहसा विचार फारसा केला जात नाही. पण गेल्या दोन दशकांचा विचार केला असता महिला व तंत्रज्ञान या विषयावर मोठ्या प्रमाणात विचार होऊ लागले आहेत. नवे वारे नवे विचार यामध्ये मुलींचे शैक्षणिक वर्षापासून ते तंत्रज्ञानाच्या क्षेत्रापर्यंत मुलींना प्रोत्साहन द्यावे. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रात अशा पद्धतीची धोरणे आखावीत यासाठी मुली व महिलांचा तंत्र तंत्रज्ञान क्षेत्रात मोठा सहभाग होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवावे लागतील. महिला या फक्त तंत्रज्ञानाच्या ग्राहक नसून सध्याच्या डिजिटल विश्वाच्या त्या शिल्पकार ही आहेत असे विचार व मनोगत झेंडा वंदन करणाऱ्या विद्यार्थिनींनी व्यक्त केले.
यावेळी स्मॅकचे खजानिस बदाम पाटील, स्मॅक क्लस्टर चेअरमन सुरेश चौगुले, आयटीआय ट्रेनिंग कमिटीचे सदस्य जयदीप चौगले, निमंत्रित सदस्य अजिंक्य तळेकर, उद्योजक श्रीकांत साळुंखे, प्राचार्य प्रसन्न वरखेडकर, आयटीआय निदेशक, निदेशिका, कर्मचारीवृंद व प्रशिक्षणार्थी मुले,मुली उपस्थित होते.
यावेळी मुस्कान तांबोळी, सानवी पाटील, वेदिका पाटील, संचिता कांबळे, रिया गुरव या महिला प्रशिक्षणार्थीनींनी व आयुष शिंदे या फिटर व्यवसाय मधील विद्यार्थ्यानेही मनोगत व्यक्त केले.
तसेेच बदाम पाटील, जयदीप चौगले, कुमार साळुंखे, इलेक्ट्रिशियन निर्देशिका स्नेहल धने व निर्देशक बाहूबली अक्कोळते यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन फिटर निदेशक शैलेश कासार यांनी केले.
