November 1, 2025

राम मंदिर स्थापना वर्षपूर्ती दिवशी येतोय “मिशन अयोध्या” चित्रपट

0
IMG-20250120-WA0245

कोल्हापूर : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर भारतातील रुपेरी पडद्यावर प्रभू श्रीरामांची महिमा उलगडणारा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीरामांना प्रेक्षकांना पाहण्याची संधी पहिल्यांदाच रसिकप्रेक्षक आणि महाराष्ट्रातील रामभक्तांना मिळणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर भारतातील कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण तेथे झाले नसून ही  संधी दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, योगिता कृष्णा शिंदे त्यांच्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या चित्रपटाद्वारे उपलब्ध झाली आहे. भारतीय इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगमातून प्रभू श्रीरामांच्या अयोध्येचे मनोहारी दर्शन होणार आहे. येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांतून हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत या चित्रपटाचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, सौ. योगिता कृष्णा शिंदे , चित्रपटातील  अजित देशमुख सर यांची व्यक्तिरेखा साकारणारे निलेश देशपांडे व कारसेवक विचारे यांच्या भूमिकेतील डॉ. अभय कामत, सागर गुंजाळ,राहूल कुलकर्णी व प्रसिद्धी प्रमुख राम कोंडिलकर इत्यादी खास उपस्थित होते.
यावेळी प्रमुख भूमिकेतील अभिनेते निलेश देशपांडे यांनी सांगितले की “मिशन अयोध्या” हा एक चित्रपट नसून एक आव्हानात्मक प्रवास आहे, जो प्रत्येक राम भक्ताला, देशवासीयांना आपल्या सोबत पुढे नेणारा आहे. हे “मिशन” प्रभू श्रीरामाच्या हृदयाशी प्रत्येकाला जोडणारा आहे तोडणारे नव्हे
असामान्य महानायकांचा इतिहास वाचत असताना आपलंही एक पान इतिहासात असावं, ही इच्छा मनाशी बाळगून आयुष्य जगणाऱ्या एका सामान्य शिक्षकाची एक असामान्य कथा आहे. अजित देशमुख हे इतिहास विषयचे शिक्षक असून ते छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या चरित्रावर व्याख्याने गाजवणारा प्रभावी वक्ता सुद्धा आहे. त्यांनी एका मिशनला पुढचे आयुष्य समर्पित  करायचे ठरवले आहे. ज्याचं नाव आहे “मिशन अयोध्या”.
साधारण पाचशे वर्षाच्या एका अभूतपूर्व संघर्षानंतर भारतातील अयोध्यामध्ये सरते शेवटी श्री राम जन्मभूमी मंदिर उभारले गेले, त्या घटनेने देशमुख सर प्रभावित होतात. रामजन्मभूमी मंदिर उभारलं गेलं, पण पुढे काय? मंदिर उभारलं पण श्रीरामाच्या विचारांचं काय? असे त्यांच्यासमोर बरेच प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांनी स्वतः ते बेचैन होतात आणि प्रभू श्रीराम ही त्यांची अस्वस्थता बनते कारण ते ज्या छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना आपला आदर्श मानतात त्या आदर्शांचा आदर्श श्रीराम आहे. अयोध्यात निर्माण झालेले भव्य मंदिर रामराज्याची सुरुवात असायला हवी, पुढच्या पिढ्यांना आदर्श राजा रामाचा इतिहास आपण सांगायला हवा. श्रीराम हा संपूर्ण विश्वाचा आहे त्याला कोणताही धर्म, जात-जमात अपवाद नाही. श्रीराम हा कोणाच्या द्वेषाचा, तिरस्काराचा विषय नसावा. त्याला सर्वांनी स्वीकारायला हवं असं त्यांचं आदर्श चरित्र आहे आणि हा विचार सर्व समाजात पोहोचवणं, तो पुढच्या पिढ्यात रुजवणे आणि रामराज्याकडे वाटचाल करणे हेच मिशन अयोध्या आहे असे ही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page