November 1, 2025

मुस्लिम बोर्डिंगच्या नेहरू हायस्कूलला कन्या महाविद्यालय मंजूर करू-ना.प्रकाश आबिटकर

0
GridArt_20250111_204031246

कोल्हापूर : मुस्लिम बोर्डिंग संचलित नेहरू हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज या संस्थेला कला आणि विज्ञान शाखेचे वरिष्ठ कन्या महाविद्यालय मंजूर करून नक्कीच सहकार्य करू त्याचबरोबर मुस्लिम बोर्डिंग आणि मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी सहकार्य करू असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.ते ईद फेस्टिव्हल समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उर्दू कार्निवल 2025 च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुस्लिम बोर्डिंगचे जेष्ठ संचालक हाजी पापाभाई बागवान होते,ना.प्रकाश आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष आणि उर्दू कार्निवल 2025 चे आयोजक गणी आजरेकर यांच्या हस्ते विधानपरिषद सदस्य इद्रिस नायकवडे यांचा सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक, माजी नगरसेवक जयंत पाटील,संस्था चालक संघाचे अध्यक्ष शारंगधर देशमुख,मनपा शिक्षण मंडळाचे प्रशासक आर.व्ही.कांबळे यांनी सुद्धा उर्दु कार्निवलला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.अबू ताकीलदार, मोहसीन मुल्ला,उद्योगपती जयेश कदम,राज महात यांच्या सत्कार करण्यात आला.माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी उप महापौर शमा मुल्ला,मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक हाजी कादर मलबारी,संचालक मलिक बागवान, जहांगीर अत्तार, रफिक मुल्ला त्याचबरोबर
माजी नगरसेवक रफिक मुल्ला उपस्थित होते.
सकाळ पासून दसरा चौक मैदानावर कोल्हापुरातील एकूण सहा उर्दू मराठी माध्यमाच्या शाळांच्या उर्दु मराठी आणि इंग्रजी भाषेतील शेर,शायरी मुशायरा,उर्दू बाज असणाऱ्या गीतांवरील समूह व वैयक्तिक नृत्य त्याचबरोबर उर्दू मधील नाटिका,एकांकिका यांचं उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.या उर्दु कार्निवल मध्ये खास हाताच्या अंगठ्या एवढ्या आकाराचे पवित्र कुराण,त्याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांनी सर्व धर्मियांना कुराणातील मतितार्थ कळावा यासाठी खास मराठी मध्ये भाषांतरित करून घेतलेल्या कुरणाची प्रत सुद्धा प्रदर्शित करण्यात आली असून दिलावर पठाण संग्रहित ऐतिहासिक दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन सुद्धा आयोजित करण्यात आले होते.अतिशय कमी दरात आयोजित करण्यात आलेल्या फूड फेस्टिव्हलला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
ऐतिहासिक दसरा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या उर्दू कार्निवल ला पहिल्याच वर्षी तब्बल 50 हजारावर कोल्हापूर करांनी भेट दिली.पुढील वर्षी तीन दिवसीय उर्दू कार्निवल आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक गणी आजरेकर, समीर मुजावर,रफिक शेख,बापूसो मुल्ला,रहीम महात यांनी सांगितले,उर्दू कार्निवल यशस्वी करण्यासाठी सर्वच उर्दू माध्यमाच्या शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी,आजम जमादार, शारीब अन्सारी,हॉटेल कसवा हिल्सचे,शब्बीर पटेल,मुसा शेख, मेहबूब तहसीलदार,यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page