November 1, 2025

महामार्गावर शिरोली छ. शिवाजीनगर येथे मोठा भुयारी मार्ग करावा

0
IMG-20250109-WA0222

शिरोली- पुणे-बेंगलोर महामार्गाच्या ६ पदरी रुंदीकरणाचे काम सुरू असून तावडे हॉटेल ते सांगली फाटा दरम्यान पीलरचा उड्डाण पूल करण्याबरोबरच शिरोली येथील शिवाजीनगर, यादववाडी भाग मुख्य गावाला जोडणारा मोठा भुयारी मार्ग पाण्याच्या टाकीजवळ करावा अशा मागणीचे निवेदन शिरोलीतील श्री शाहू स्वभिमानी आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी महामार्ग प्राधीकरणचे प्रकल्प अधिकारी संजय कदम यांना दिले. आवश्यक भुयारी मार्ग न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला. या निवेदनाची त्वरित दखल घेऊन नव्या प्रस्तावात आवश्यक भुयारी मार्गाचा समावेश करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणचे अभियंता महेश पाटोळे यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पहाणी केली.
या महामार्गाचे चौपदरीकरण करताना शिवाजीनगर कमानीजवळ पादचाऱ्यासांठी केलेला छोटा भुयारी मार्ग छोटा कमी उंचीचा झाल्याने याठिकाणी गटारीचे पाणी साचून राहीले. याशिवाय सेवा रस्त्याची उंची वाढल्याने हा भुयारी मार्ग निरुपयोगी झाला. आता सहापदरीसाठी रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामात शिवाजीनगर कमान ते पाण्याची टाकी पर्यंत छोटी चारचाकी वाहाने, इतर लहान वहाने, पादचारी यांना ये-जा करता येईल असा मोठा भुयारी मार्ग करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. महामार्गाच्या पश्चिमेकडे असलेल्या मूळ गावाकडील बाजूस सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, प्राथामिक आरोग्य केंद्र, स्मशानभूमी सह ग्रामपंचायत, इतर कार्यालये आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक, विद्यार्थी व वाहनधारक यांना या ठिकाणी भुयारी मार्गाची आवश्यकता आहे. म्हणूनच भुयारी मार्गाच्या मागणीचे निवेदन माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण, माजी उपसरपंच सुरेश यादव, शिवसेना शहर प्रमुख राजकुमार पाटील, आघाडीचे नेते शिवाजीराव पाटील, विजय पोवार यांच्या नेतृत्वाखाली उजळाईवाडी येथील महामार्ग प्राधिकरणच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता कदम यांना दिले.
प्रकल्प अधिकारी संजय कदम यांनी त्वरित पहाणीसाठी इंजिनियर आणि अधिकारी पाठवले आणि आवश्यक बदल करून न नवीन आराखडा प्रस्तावित करण्याचे काम सुरू असून नव्या आराखड्यात मोठा भुयारी मार्गाचा समावेश करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी श्री शाहू स्वभिमानी आघाडीचे शिवसेना उपशहर प्रमुख अशोक खोत, युवासेना तालुका अध्यक्ष योगेश चव्हाण, अशोक कोळसे, तात्यासो उनाळे, सिद्धू पुजारी, रणजीत कदम, राजू येसुगडे लग्माण्णा नाईक, राहुल चव्हाण बाजीराव कपले, आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page