November 2, 2025

कोल्हापूरात बेहिशोबी २ कोटींची रोकड जप्त ; कारसह दोघांना अटक

0
IMG-20241228-WA0359

कोल्हापूर : शहरातील नागाळा पार्कमधील पाटलाचा वाडा या हॉटेलच्या मागे, आज शनिवार दिनांक २७-१२-२०२४ रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास किरण हणमंत पवार रा. देवापुर ता माण, जि सातारा तसेच त्याचा साथीदार आण्णा सुभाष खडतरे रा केळकर,हॉस्पीटल जवळ, खडतरे गल्ली, सांगोला, जि सोलापुर या दोघांच्या ताब्यात असलेल्या मारुती ब्रिजा कार नंबर KA-51-ML-4552 मध्ये तब्बल बेकायदेशीर रोख रक्कम मिळुन आली. शाहूपुरी पोलीसांनी या रक्कमेबाबत अधिक चौकशी केली असता सदर रक्कमेच्या संदर्भात त्यांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे न दाखवल्यामुळे सदरची रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की शाहूपूरी पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून नागाळा पार्क परिसरात असलेल्या या कारची तपासणी केली असता कारमध्ये तब्बल १ कोटी ९८लाख ५oo रुपयाची रोख रक्कम मिळून आली याबाबत कारमधील किरण पवार आणि आप्णा खडतरे यांचेकडे चौकशी केली असता त्यांना योग्य ती माहिती किंवा कागदोपत्री पुरावा देता आला नाही. पो. नि. संतोष डोके यांनी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून अमोल अविनाश पंढरपुरकर [आयकर निरीक्षक], विनयकुमार दुबे [आयकर निरीक्षक] यांचे उपस्थीतीत पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी शासकीय पंचांच्या उपस्थीतीत बेकायदेशीर रोख रक्कम एकुण 1,98,99,500/- रुपये जप्त करुन पुढील कारवाई करीता ताब्यात घेतली. बेकायदेशीर रोख रकमेबाबत आयकर विभागाकडून कार्यवाही सुरु आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उप विभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके व त्याच्या पथकातील स.पो.नि. विशाल मुळे, फौजदार संजीव बरगेकर, हवालदार तानाजी चौगले, दयानंद पाटील, पो. ना. चंद्रशेखर बांटुगे, कॉन्स्टेबल दिंगबर कुंभार, रत्नदिप जाधव, महिला कॉन्स्टेबल पूजा सावंत यांनी सदरची कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page