November 2, 2025

मराठी चित्रपट ‘संगीत मानापमान’ चा म्युझिक लाँच सोहळा संपन्न

0
IMG_20241202_125851

मुंबई : जिओ स्टुडिओज प्रस्तुत आगामी मॅग्नम ऑपस संगीतमय चित्रपट “संगीत मानापमान” चा ग्रँड म्यूझिक लाँच सोहळा पार पडला. १० जानेवारी २०२५ ला “संगीत मानापमान” हा सिनेमा आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. खाडिलकरांच्या ११४ वर्ष जुन्या अभिजात नाटकावरून प्रेरित, “संगीत मानापमान” हा सिनेमा म्हणजे कला, संस्कृती आणि संगीताचा एक उत्सव आहे.
नयनरम्य दृश्य, अस्सल संगीतमय कथाकथन आणि एका पेक्षा एक दिग्गज कलाकार असलेल्या या चित्रपटात महान संगीतकार शंकर-एहसान-लॉय ह्यांनी या चित्रपटासाठी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत, ह्या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी जसे शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे हयांनी आपला आवाज दिला आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत.
“संगीत मानापमान” च्या या भव्यदिव्य म्युझिक लॉन्च कार्यक्रमामध्ये संपूर्ण चित्रपटाची स्टारकास्ट उपस्थित होती. इतकच नव्हे तर गायकांद्वारा लाईव्ह परफॉर्मन्सचा आस्वाद सुद्धा प्रेक्षकांना घेता आला. संगीत मानापमान या मूळ नाटकातील गाजलेल्या गाण्यांचे आणि चित्रपटातील नवीन रचनांचे मिश्रण ह्यावेळी पहायला मिळाले, प्रत्येक गायकाने आपलं गाणं स्टेजवर सादर करून प्रेक्षकांना आपल्या मधुर सुरांनी एका वेगळ्याच जगात असल्याचा अनुभव दिला.
मीडिया अँड कंटेंट बिझनेस, आरआयएल च्या अध्यक्षा ज्योती देशपांडे म्हणाल्या संगीत मानापमान ही मराठी संगीत रंगभूमीच्या शाश्वत कलेला केलेले अभिवादन आहे, त्यामुळे सुमधुर असं संगीत आणि चित्रपटाची कथा महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्र बाहेरील प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच आवडेल. शंकर-एहसान-लॉय यांच्या अलौकिक टॅलेंट आणि बुद्धिमत्तेसह, संगीत कसं सगळ्यांना एकत्रित करतं आणि प्रेरणा देऊ शकतं याचं हा चित्रपट एक उत्तम उदाहरण आहे. संगीत मानापमान व्दारे कलेचा एक उत्कृष्ट नमुना जागतिक स्तरावर प्रेक्षकांसमोर सादर करताना आम्हाला खूप अभिमान वाटतोय.”
संगीतकार शंकर महादेवन ह्यांनी सांगितलं, “१८ अविश्वसनीय प्रतिभावान गायकांसोबत काम करणं एक अद्भूत अनुभव आहे. या चित्रपटाच्या संगीतात नावीन्य आहे. जीओ स्टुडिओजच्या निमित्ताने नक्कीच “संगीत मानापमान” ला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे.
अभिनेते आणि दिग्दर्शक सुबोध भावे म्हणाले की आम्ही संगीत मानापमान सादर करत आहोत, जे महाराष्ट्रीयन संस्कृतीचं प्रतिबिंब आहे. दिग्गज त्रिकूट शंकर-एहसान-लॉय, 18 प्रतिभावान गायकांनी सजलेल्या भावपूर्ण रचनांची जादू मोठ्या पडद्यावर जादू मोठ्या पडद्यावर नक्कीच दिसेल.
चित्रपटात सुबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page