November 2, 2025

एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री, आ. क्षीरसागर यांच्या मंत्रिपदासाठी अंबाबाईला साकडं

0
IMG-20241127-WA0158

कोल्हापूर : गोरगरीब जनता आणि रुग्णांचे कैवारी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत तसेच आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्री आणि पालकमंत्री पद मिळावे, यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि बरे झालेल्या रुग्णांकडून आई अंबाबाईला साकड घालण्यात आले. आरोग्य सेवेचा महायज्ञ अखंडपणे सुरू राहण्यासाठी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे, असे मत बरे झालेल्या रुग्णांनी व्यक्त केले. उपस्थित पदाधिकारी आणि रुग्णांनी आई अंबाबाईच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच होऊ देत यासाठी प्रार्थना केली. वैद्यकीय मदत मिळालेल्या लहान मुलांनी एकनाथ शिंदे यांचा फोटो दाखवत हेच मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली.
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रमेश खाडे, सुरेश माने, शिवसेना दक्षिण शहर प्रमुख अमरजा पाटील, शहर समन्वयक विनायक जरांडे, कागल तालुका महिला समन्वयक फरीन मकुबाई, विनायक जाधव, रमेश जाधव, निखिल निंबाळकर, देवगोंडा अवघडे, संदीप बोधे आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page