November 1, 2025

डॉ. सुजित मिणचेकरांची हातकणंगलेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून उमेदवारी

0

हातकणंगले- गेल्या २० वर्षाहून अधिक काळ शिवसेनेशी असलेली निष्ठा निष्फळ ठरल्याच्या भावना व्यक्त करीत महाआघाडीने शिवसेनेतून उमेदवारी डावलल्याने माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर यानी हातातील शिवबंधन सोडून छातीवर शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून घेतला. त्यानी स्वाभिमानी शेतकरी संघटननेचे नेते. माजी खा. राजू शेट्टी यांच्यासह आपले हजारो समर्थक आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जल्लोषी वातावरणाने शक्ती प्रदर्शन करीत डॉ. सुजित मिणचेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
डॉ. सुजित मिणचेकर यांना२०१९ च्या निवडणूकीत कॉंग्रेसचे आ. राजूबाबा आवळे यांचेकडून निसटता पराभव पत्करावा लागला. त्यानंतर गेल्या ५ वर्षात बदललेल्या राजकिय समीकरणात कॉंग्रेस शिवसेना, राष्ट्रवादी हे विरोधक महाविकास आघाडी म्हणून एकत्र आले. त्यामुळे या निवडणूकीत ठरलेल्या धोरणानुसार विद्यमान आमदार म्हणून काँग्रेसचे राजूबाबा आवळे याना उमेदवारी मिळाली. आणि ५ वर्षे तयारी करूनही डॉ. मिणचेकर यानां डावलले.
आपल्या राजकिय भवितव्याचा प्रश्न निर्माण झाल्याने पक्ष बदलून निवडणूकीच्या रिंगणात उतरावे लागले. यामध्ये जसा त्यांच्या समर्थकांनी केलला आग्रह आहे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मिळालेले पाठबळही महत्वाचे ठरले आहे. त्यामुळे डॉ. सुजित मिणचेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना राजू शेट्टी हातकणंगले येथील कार्यलयात कार्यकर्त्यांसह उपस्थित राहीले. त्यामुळे डॉ. मिणचेकर यांच्याबद्दल वातावरण उत्साहपूर्ण बनले होते. आता हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडी, महायुती आणि परिवर्तन महाशक्ती अशी तिरंगी चुरशीची लढत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page