November 1, 2025

कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकीसाठी २२ उमेदवारांनी साधला गुरुपुष्यअमृत योग

0
IMG_20241024_200046

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी अंतर्गत तिसऱ्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग साधून जिल्ह्यात २२उमेदवारांनी ३४ नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत.

यामध्ये २७१-चंदगड विधानसभा मतदारसंघात २ उमेदवारांनी ३ नामनिर्देशनपत्र, २७२ राधानगरी विधानसभा मतदारसंघात २ उमेदवारांनी ५ नामनिर्देशनपत्र, २७३ कागल विधानसभा मतदारसंघात २ उमेदवारांनी ३ नामनिर्देशनपत्र, २७४ कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात ७ उमेदवाराने ८ नामनिर्देशनपत्र, २७५ करवीर विधानसभा मतदारसंघात ३ उमेदवारांनी ५ नामनिर्देशनपत्र, २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात ० उमेदवारांनी ० नामनिर्देशनपत्र, २७७ शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात २ उमेदवारांनी ३ नामनिर्देशनपत्र, २७८ हातकणंगले विधानसभा मतदारसंघात ० उमेदवाराने ० नामनिर्देशनपत्र, २७९ इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात ३ उमेदवारांनी ५ नामनिर्देशनपत्र, २८० शिरोळ विधानसभा मतदारसंघात १ उमेदवारांनी २ नामनिर्देशनपत्र दाखल केली. असे जिल्ह्यात एकूण २२ उमेदवारांनी ३४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांचा मतदार संघ, उमेदवाराचे नाव व पक्ष पुढील प्रमाणे-
२७१ चंदगड विधानसभा मतदारसंघ कुपेकर देसाई संग्रामसिंह भाग्येशराव, अपक्ष २ अर्ज, प्रकाश रामचंद्र रेडेकर, अपक्ष
२७२ राधानगरी विधानसभा मतदारसंघ-कृष्णराव परशराम उर्फ के पी पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्यावतीने ४अर्ज
रणजितसिंह कृष्णराव पाटील, अपक्ष
२७३ कागल विधानसभा मतदारसंघ-घाटगे नवोदिता समरजितसिंह, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) १ अर्ज, घाटगे समरजितसिंह विक्रमसिंह व अपक्ष असे २ अर्ज

२७४ कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ
ऋतुराज संजय पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,
पुजा ऋतुराज पाटील, अपक्ष दोन अर्ज
अमल महादेवराव महाडिक, भारतीय जनता पार्टी
शौमिका अमल महाडिक, भारतीय जनता पार्टी
सागर राजेंद्र कुंभार, अपक्ष, संतोष गणपती बिसुरे, अपक्ष
वसंत जिवबा पाटील, अपक्ष
२७५ करवीर विधानसभा मतदारसंघ राहूल पांडुरंग पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने २ अर्ज, आणि तेजस्विनी राहूल पाटील यांचे २अर्ज. संताजी फत्तेसिंगराव घोरपडे, जन सुराज्य शक्ती १अर्ज.
२७६कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ-निरंक
२७७ शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ सत्यजित बाबासाहेब पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), विनय विलासराव कोरे, जन सुराज्य शक्तीच्या वतीने २ अर्ज
२७८ हातकणंगले विधानसभा मतदारसंघ-निरंक
२७९ इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ-प्रकाश कल्लाप्पा आवाडे, भारतीय जनता पार्टीच्या वतीने ४ अर्जसॅम उर्फ सचिन शिवाजी आठवले, अपक्ष,
२८० शिरोळ विधानसभा मतदारसंघ-राजेंद्र शामगोंडा पाटील, राजर्षी शाहू विकास आघाडी असे दोन अर्ज

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page