ट्विंकल स्टार स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची पारंपरिक वेषात दहीहंडी
शिरोली : गोकुळ अष्टमी निमित्त सर्वत्र लाखमोलाच्या दहिहंडी फोडण्यासाठी ईर्षा आणि धुमधडाका सूरु असताना शिरोली पुलाची येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये दहिहंडी विद्यार्थी, विदयार्थीनीनी पारंपरिक पद्धतीने राधा, कृष्ण, बालगोपाल यांच्या वेषात उत्साहात साजरी करण्यात आली,
शिरोली पुलाची येथील ट्विंकल स्टार स्कूलमध्ये विदयार्थ्यांनी बालगोपाल बनून दहिहंडीचा चांगलाच आनंद घेतला. राधा, श्रीकृष्ण बालगोपालांच्या वेशभूषेत अवतरलेल्या विदयार्थ्यांनी मानवी मनोरे रचत दहिहंडी फोडली. यानिमित्ताने मुलांना श्रीकृष्ण जन्माची कथा दाखविण्यात आली. मुलीनी राधा बनून गाण्यांच्या ठेक्यावर ताल धरला, शाळेचे सर्व विदयार्थी बालगोपाल, श्रीकृष्ण, राधा, पेंद्या, श्रीधर, गोपिका यांच्या वेशभूषेत उस्फुर्तपणे सहभागी झाले होते. याप्रसंगी मुला-मुलींनी छान, नृत्य सादर केले. शेवटी दहिहंडीचा प्रसाद वाटून् दहिहंडी उत्सवाची सांगता झाली. याप्रसंगी शाळेचे चेअरमन, संतोष बाटे सर, मुख्याध्यापिका सौ. मनिषा संतोष बाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन उपमुख्याध्यापिका सौ. प्रतिक्षा पाटील आणि सहाय्यक शिक्षिकांनी केले. त्याला उपस्थित ग्रामस्थ आणि पालकांनीही चांगला प्रतिसाद देऊन समाधान व्यक्त केले.
