पुष्कर जोग घेऊन येतोय मराठी चित्रपट ‘टॅबू’
मुंबई : पुष्कर जोगने एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘टॅबू’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांच्या सहकार्याने, गुझबम्प्स एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर सुरेख जोग करणार असून योगेश महादेव कोळी या चित्रपटाचे डीओपी आहेत.
‘टॅबू’ची खासियत म्हणजे ॲमस्टरडॅम आणि पॅरिसमध्ये चित्रित होणार हा पहिला मराठी चित्रपट असणार आहे. दरम्यान, या चित्रपटात कोणते चेहरे झळकणार हे जाणून घेण्यासाठी थोडी पाहावी लागेल.
आपल्या नवीन प्रोजेक्टबद्दल पुष्कर जोग म्हणतो, ” एक कलाकार म्हणून माझ्याकडून जे सर्वोत्कृष्ट देता येईल, ते देण्याचा मी नेहमीच प्रयत्न करतो. रिऍलिस्टिक चित्रपट हे प्रेक्षकांना जास्त जवळचे वाटतात. त्यामुळे मी नेहमीच नातेसंबंधांवर चित्रपट बनवतो. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. काही नवनवीन देण्याचा माझा कायमच प्रयोग करतो. ‘टॅबू’च्या माध्यमातूनही मी काहीतरी नवीन घेऊन येत आहे. नुकतीच चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. लवकरच चित्रपटही भेटीला येईल.”
