शिरोलीतील ट्विंकल स्टार स्कूलचे किक बॉक्सिंग स्पर्धेत उत्तुंग यश
शिरोली : येथील ट्विंकल स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वडणगे ता. करवीर येथे झालेल्या जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत चांगले यश मिळवले. सर्व विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून ट्विंकल स्टार स्कूलच्या संघाने जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावला.
ट्विंकल स्टार स्कूलच्या २२ विद्यार्थ्यांनी या किक बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेतला होता. सर्वच विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवत यश मिळवले. यामुळे या सर्वांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या विद्यार्थ्यांना ट्विंकल स्टार स्कूलचे कराटे प्रशिक्षक शुभम महाकाळे, दीक्षा लोहार यांचे मार्गदर्शन लाभले. तर चेअरमन संतोष बाटे, प्रिन्सिपल मनीषा बाटे यांनीही प्रोत्साहन देत विशेष सहकार्य केले.
या सर्व यशस्वी स्पर्धक विद्यार्थी विद्यार्थिनींचा ट्विंकल स्टार स्कूलमध्ये चेअरमन संतोष बाटे प्रिन्सिपल मनीषा बाटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्हा.प्रिन्सिपल सीमा लोखंडे, प्रतीक्षा पाटील यांचेसह शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थी उपस्थित होते.
