वळीवडे स्टेशनवर एक्सप्रेस रेल्वे थांबण्यासाठी पाठपुरावा करणार : खा. शाहू छत्रपती
गांधीनगर : वळीवडे (गांधीनगर) रेल्वे स्टेशनवर सर्व एक्सप्रेस गाड्या थांबण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करणार असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असे आश्वासन खा. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी माजी उपसरपंच गुड्डू सचदेव यांच्या नेतृत्वाखालील व्यापारी, ग्राहक व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाला दिले.
गुड्डू सचदेव व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाहू महाराजांची भेट घेऊन या प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा केली. यावेळी संयोगीताराजे छत्रपती म्हणाल्या या रेल्वेच्या विषयावर वचन दिलता वचनशी मी कटिबूद आहे आणि याबाबत खासदार संभाजीराजे यांनी रेल्वे पुणे विभागाच्या इंदू दुबे यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून या प्रश्नाचे गांभीर्य व गरज याबाबत माहिती दिली आहे. रेल्वे समितीचे पुणे येथील निखिल काची हेही संभाजीराजे छत्रपतींच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
शिष्टमंडळाशी बोलताना संभाजीराजे म्हणाले की या अधिवेशनाच्या आत खासदार श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या मार्गदर्शन खाली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मी व श्रीमंत शाहू छत्रपती महाराज या प्रश्नाबाबत भेट घेणार आहोत. प्रवाशांची प्रचंड गर्दी असूनही येथे एक्सप्रेस गाड्या का थांबत नाही, यावर चर्चा करणार आहोत. लवकरच वळीवडे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबण्याचे गांधीनगरवासियांचे प्रयत्न फलद्रूप होतील.
गुड्डू सचदेव यांच्यासह गिरीश राजपूत, जय लालवानी, सुरज होतवाणी, महेंद्र हरचंदानी, कालू सचदेव, अमित वधवा, विशाल सुंदराणी, रोशन सचदेव, अमित तलरेजा यांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराजाना रेल्वेचे प्रश्न व समस्या सांगितल्या.
