November 2, 2025

स्मॅकचा रक्तदानासह शासकीय योजना पोहचवण्याचा उपक्रम कौतुकास्पद : जिल्हाधिकारी येडके

0
IMG-20240614-WA0160

कोल्हापूर : रक्तदान शिबिरासह शासनाच्या आरोग्य योजना उद्योग क्षेत्रातील लोकांपर्यंत थेट पोहोचवण्याचा स्मॅकचा उपक्रम हा कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडके यांनी केले. ते शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर (स्मॅक)च्या वतीने आयोजित शिरोली एमआयडीसीतील स्मॅक भवनमध्ये जागतिक रक्तदान दिना निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना बोलत होते.
या कार्यक्रमाचे संयोजक स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, जिल्हाधिकारी अमोल येडके, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्यासह स्मॅकचे संचालक, उद्योजक यांच्या प्रमुख उपस्थित या रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. दोन दिवस चालणाऱ्या या शिबिराबाबत बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडके म्हणाले की रक्तदान का करावे? ह्याचे शारीरिक फायदे काय आहेत? याचे महत्त्व रक्तदान शिबिरातच द्यावे. म्हणजे रक्तदात्यांचे प्रमाण वाढेल. स्मॅकने या शिबिराबरोबर शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आरोग्यसेवा, विमा संरक्षण, तपासणी आदी सेवा सुविधा लोकांपर्यंत थेट पोहोचवण्याचे केलेले काम कौतुकास्पद आहे. अशाच योजनांच्या उपक्रमासाठी प्रशासन स्मॅकला नेहमी सहकार्य करेल.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांनी  रक्तदानाचा रुग्णांना आणि समाजाला कसा उपयोग होतो आणि रक्तदान का आवश्यक आहे याचे महत्त्व सांगून स्वतः या शिबिरात रक्तदान करणार असल्याची ग्वाही दिली.
अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी गेल्या वेळी तब्बल 1700 रक्तदात्यांनी स्मॅकच्या शिबिरात रक्तदान केले. यावेळी त्यामध्ये निश्चित वाढ होईल असा विश्वास व्यक्त करून रक्तदात्यांना शासकीय आरोग्याच्या सेवा आणि आरोग्य तपासणी, विमा संरक्षण तसेच इतर जास्तीत जास्त फायदे यावेळी स्मॅकने देण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.
यावेळी स्मॅकचे  उपाध्यक्ष जयदीप चौगले, ऑ. सेक्रेटरी भरत जाधव, खजानिस बदाम पाटील, संचालक अतुल पाटील, निमंत्रित सदस्य विनायक लाटकर, दिपक घोंगडी,  प्रकाश खोत, कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर, मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागल हातकलंगलेचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, कोल्हापूर फाउंड्री अँड इंजीनियरिंग क्लस्टरचे चेअरमन दीपक चोरगे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूर चे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे. इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेचे कोल्हापूर जिल्ह्याचे वरिष्ठ व्यवस्थापक संतोष के.‌ सिंग, ब्लड बँकेचे प्रमोद मंगसुळे, सीपीआर आरोग्य तपासणी टीमचे शशिकांत बल्लाळ, ईएसआयसीचे रामाशिष कुमार, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोलीचे डॉ. पंकज पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page