November 2, 2025

‘अरनमानाई ४’ हिंदीतही डब होऊन येतोय २४ मे रोजी

0
IMG-20240515-WA0340

मुंबई : ‘अरनमानाई ४’ हा ३ मे रोजी प्रदर्शीत झालेला चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने हिंदीतही डब करण्यात आला आहे. २४ मे रोजी ‘अरनमानाई ४’ हिंदीमध्येही रिलीज होणार आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना थरारक अनुभव देत मंत्रमुग्ध केले आहे.
‘अरनमानाई ४’मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या सुंदर सी. यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं असून, खुशबू सुंदर आणि एसीएस अरुण कुमार यांच्यासह साजिद कुरैशी आणि सुशील लवानी यांनी यशस्वीपणे चित्रपट निर्मितीची धुरा सांभाळली आहे. बाक नावाच्या भयानक भूताच्या विश्वात नेणारा ‘अरनमानाई ४’ पूर्व भारतीय लोककथांच्या सफरीवर नेणारा आहे. तमिळनाडूच्या कोवूरमधील रहस्यमय पार्श्वभूमीवर आधारलेला हा चित्रपट कुटुंबातील चांगल्या आणि वाईट शक्तींमधील संघर्षाचे चित्रणही करतो.
तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना या दोन तगड्या अभिनेत्री यात मुख्य भूमिकेत आहेत. थरारक अनुभव देणारा दोघींचा अभिनय अखेरपर्यंत खिळवून ठेवणारा आहे. या चित्रपटातील प्रत्येक दृश्याला रोमांचक वातावरणाची किनार जोडण्यात आली आहे.
दहा दिवसात ६६ कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय करणाऱ्या ‘अरनमानाई ४’ या चित्रपटाने केवळ व्यावसायिक पातळीवर यश संपादन केले नसून, भारतीय सिनेमाच्या कथाकथन क्षमतेच्या कक्षाही रुंदावण्याचे काम केले आहे. रहस्य, हास्य आणि उत्साहाचा एकत्रित अनुभव देणाऱ्या या ब्लॅाकबस्टर चित्रपटाचा आनंद जगभरातील प्रेक्षकांना लुटता यावा यासाठी कार्मिक फिल्म्सने ‘अरनमानाई ४’ हिंदीत डब करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page