सत्तेसाठी मोदींची वखवखलेली आत्मा महाराष्ट्रात : उद्धव ठाकरे
कोल्हापूर : रक्त सांडून मिळवलेली ही मुंबई आम्ही महाराष्ट्रद्रोहयांच्या हातात जाऊ देणार नाही. तुमच्या बळावर सत्ता मिळत नाही म्हणून आमच्यातले गद्दार तुम्हाला उभे करावे लागतात. सत्तेसाठी तुमचा आत्मा वाखवखलेला आहे अशी जहरी टिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सत्तेचा गैर वापर करणाऱ्यांना महाराष्ट्र हिसका दाखवेल असा इशारा दिला. ते इंडिया आणि महाविकास आघाडीचे कोल्हापूर मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या गांधी मैदानात झालेल्या भव्य शिव-शाहू निर्धार प्रचारसभेत बोलत होते.
महायुतीतील शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या सभेला तोडीसतोड उत्तर म्हणून झालेल्या या महाविकास आघाडीच्या सभेबद्दल आणि पवार-ठाकरे काय बोलणार याबाबत प्रचंड उत्सुकता होती. घटक पक्षातील अनेक नेत्यांनी केंद्र सरकारचा कारभार, राज्यातील महायुतीचा कारभार, आणि मोदींची हुकूमशाही याबाबत प्रखर मते मांडताना पुरोगामी विचाराचे, आणि विकासाची दृष्टी असणारे शाहू महाराज खासदार झाले तर राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार देशभर पोहचेल आणि संविधानाचे खऱ्या अर्थाने रक्षण होईल असे सांगितले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी जोशपूर्ण भाषणात, विरोधाकांचे महाराष्ट्रद्रोह, गुजरात प्रेम, गद्दार, मोदींकडून सत्तेचा गैरवापर यावर तोफ डागली.
उद्धव ठाकरे म्हणाले शिवसेनेची मशाल ही संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा स्मारकाच्या शेतकरी आणि कामगारांच्या हातातील आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असे म्हटले होते. आता दोन सुरतवाले माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्र लुटत आहेत. मग आम्ही आमच्या डोळ्यावरती काय झापडे लावून बघत बसणार का? असा सवाल करून पुढे म्हणाले.गुजरात मध्ये भूकंप आला होता झाला होता आहे की पवार साहेबांबद्दल की हा माणूस दुसऱ्या पक्षाचा आहे हा माणूस दुसऱ्या राज्यातला आहे तरी देखील स्वतः पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की मी महाराष्ट्र मध्ये असताना जो आमच्याकडे भूकंप झाला होता लातूर किल्लारी त्याच्यामुळे त्या आपत्ती व्यवस्थापनाचे काही मार्ग मला माहिती आहेत काय मदत पाहिजे ते सांगा मी करायला तयार आहे पक्षाच्या पलीकडे जाऊन राज्याच्या सीमा पलीकडे जाऊन पवार साहेब होऊन गेले ते गुजरातला आणि मदत केली होती. अटलजी पंतप्रधान असताना आपत्ती व्यवस्थापनाचा अध्यक्षपद हे पवार साहेबांकडे दिले होते. त्याला दिलदार पणा लागतो जो पवार साहेबांकडे आहे आणि अटलजींकडे होता आणि आता मोदीजी त्यांनाच भटकती आत्मा म्हणतात. राम मंदिराच्या वेळेला एक कोणतरी म्हणाले मोदीजी म्हणजे आजचे शिवाजी महाराज आहेत. अजिबात नाही! आमच्या दैवताची तुलना मोदींबरोबर होऊच शकत नाही. असाल तुम्ही मोदीभक्त तर घरी त्यांचा उदो उदो करा पण आमच्या महाराष्ट्राच्या दैवताच्या वाटेला जाऊ नका. आणि महाराजांशी तुलना कराल तर महाराष्ट्र सहन करणार नाही आणि म्हणूनच जो महाराष्ट्राच्या मुळावर आलेला आहे त्याचा सुफडासाफ आम्ही केल्याशिवाय राहणार नाही.
आमची काही पोरं तुम्ही चोरलीत. तुमची मुलं पळवणारी टोळी. काही गद्दार चोरले पण हे बघा ना किती आहेत माझ्या समोर. तुम्ही चाळीस चोरले असाल पवार साहेबांचे काही चोरले असाल पण लाखो लोक महाराष्ट्रातील काँग्रेस सोबत ही कांद्याला खांदा लावून तुमचा सुफडासाफ करण्यासाठी उभे आहेत.
उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज यांच्या बद्दल बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की शाहू महाराजांनां मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर मी त्यांच्या वाड्यावर गेलो होतो. त्यांचे आधित्यशील वागणे आणि आदराने बोलले आजही तसेच आहे.
गेल्या वेळेला भाजपचं ठरलं होतं म्हणून त्यांनी शिवसेनेचे उमेदवार त्यांनी पाडले. आता लोकसभेला तुम्हाला पाडून तो सूड घ्यायला मिळालेला आहे. ज्यांनी माझ्या शिवसैनिकांशी, भगव्याशी गद्दारी केली त्यांचा सूड घ्यायला मी कोल्हापूरमध्ये आलेलो आहे. तो तुम्ही घेऊन दाखवणार आहात की नाही? काहीजण प्रश्न विचारतात की शिवसेनेची मत काँग्रेसला ट्रान्सफर होणार का? होणार, का नाही? कारण काँग्रेसच्या हातामध्ये मशाल आहे. ती मशाल घेऊन चार तारखेला आपल्याला उद्या विजयाची तुतारी फुंकायची आहे.
खा. शरद पवार यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील कोल्हापूरचे योगदान आणि त्यावेळच्या नेत्यांची आठवण करून देत. महाराष्ट्रविरोधी मोदी सरकारला हिसका दाखवण्याची वेळ आली असल्याचे सांगितले.
चौकट :सं
भाजीराजेंची माफी मागितल
राज्यसभेच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना विरोध केला होता या निवडणुकीच्या निमित्ताने त्याची पुन्हा चर्चा होत आहे. ही बाब उद्धव ठाकरे यांनी स्वतः कबूल करून संभाजीराजे यांची व्यासपीठावरच भाषणात जाहीर माफी मागितली
मोदींचा खोटेपणा : परुळेकर
पंतप्रधान म्हणायला लाज वाटावी असा खोटारडा मोदी सारखा दुसरा पंतप्रधान झाला नाही. आपल्या डिग्री पासून जन्मदिनांकापर्यंत सगळ्याचाच खोटेपणा त्यांनी केला. चहा विकला म्हणून सांगितलं. ते रेल्वे स्टेशनच त्यावेळी अस्तित्वात नव्हते. अशी टिका समाजवादी पक्षाचे शिवाजीराव परुळेकर यांनी केली.
खेळाडू 25 कोटीत, गद्दार 50 खोक्यात
पुन्हा येईन म्हणणारे दोन पक्ष फोडून आले पण ते महाराष्ट्राचे अस्मिता फोडू शकणार नाहीत. आयपीएलचे खेळाडू 25 कोटी रुपयाला विकले गेले. आपले आमदार 50 खोक्यात विकले गेले अशा गद्दारी करणाऱ्यांचा अनाजी पंत होणार. असा टोला राष्ट्रवादीचे यशवंत गोसावी यांनी हाणला.
मोदींचा खरा परिवार ?
मोदी देश माझा परिवार असे म्हणतात पण अमित शहा, अदानी, अंबानी, ईडी, सीबीआय, हाच तुमचा परिवार आहे. शेतकरी तुमचा परिवार नाहीये का? तुम्ही दोन कोटी नोकऱ्याचं आमिष दाखवलं म्हणून रात्रंदिवस अभ्यास केला, डिग्री घेतली, इंजिनियर झाले पण आता त्यांच्यावर वेळ काय आली आहे? या सगळ्या डिगऱ्या कपाटात टाकलेल्या आहेत आणि कुठेतरी हा तरुण शेतमजुरी करत आहे. लग्न पण होत नाहीयेत. हा तरुण व्यसनाधीन व्हायला लागलाय हा तरुण तुमच्या कुटुंबातला एक भाग नाही का? असा सवाल नंदाताई बाभूळकर यांनी केला.
ते दहा हजार माझ्याकडेच
धाराशिवचे ओमराजेंनी मोठ्या जाहीर सभेमध्ये सांगितलेलं होतं की मी तुमचा एक फोन उचलला नाही तर .किंवा मी जर कामात असेल तर तुमचा फोन आला आणि त्या फोनला जर मी प्रतिसाद देऊ शकलो नाही मी परत जर तुम्हाला फोन केला नाही तर मी तुमचा प्रत्येकाचा गुन्हेगार असेन. संजय मंडलिक यांनी फोन उचलेले उदाहरण दाखवा आणि माझ्याकडून दहा हजार रुपये घेऊन जाणार असे आव्हान मी दिले होते. आज शेवटची सभा आहे. ते दहा हजार रुपये माझ्याकडेच आहेत. असे अमरीश घाटगे यांनी सांगितले.
…. तर त्यांना सोडणार नाही! : संभाजीराजे
छत्रपती घराण्यावर आणि रायगड राज्यभिषेक, गडकोट संवर्धन याबाबत टीका करणाऱ्यांना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सडेतोड उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले की ही गादी छत्रपती शिवरायांची, राजर्षी शाहू महाराजांची, महाराणी ताराबाईंची आहे. आमच्यावर टीका केली तर आम्हाला काही फरक पडणार नाही. पण जर कोणी गडकोट संवर्धन आणि मराठा आरक्षणावर बोलले तर त्यांना मी सोडणार नाही.
पक्ष चोर आणि बॅट चोर
महाराष्ट्रामध्ये तुम्ही पक्ष पळवू शकता, तुम्ही आमदार, खासदार पळवू शकता. तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होऊ शकता. पण तुम्ही कधीही शरद पवार आणि उद्धव ठाकरे होऊ शकत नाही. धोनीची बॅट चोरणारा कधी धोनी होत नाही. असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी लागवला
