गांधीनगर स्टेशनवर रेल्वे थांबवण्यासाठी संयोगिताराजेंची तत्परता
कोल्हापूर : गांधीनगर, वळीवडे रेल्वे स्टेशनवर सर्व एक्सप्रेस गाड्या थांबत होत्या. कोरोना काळात त्या बंद झाल्या. गांधीनगर येथील माजी उपसरपंच गुड्डू सचदेव आणि व्यापारी संघटनांनी संयोगिता राजे छत्रपती यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांनी त्वरित रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आवश्यक मागणी पत्रे द्या त्वरित निर्णय घेऊ असा सकारात्मक प्रतिसाद दिला. विद्यमान खासदारांनी केवळ आश्वासने देऊन इतके वर्षे टोलवले संयोगिता राजे छत्रपती यांनी त्वरित कृती केली म्हणून गांधीनगर मधील समस्त सिंधी समाज शाहू महाराजांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही उपसरपंच गुड्डू सचदेव यांनी दिली.
श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ संयोगिताराजे छत्रपती यानी गांधीनगर वळवडे भागात दौरा केला. यावेळी गांधीनगरचे उपसरपंच गुड्डू सचदेव आणि सिंधी समाजाचे काही व्यापारी आणि कार्यकर्ते यांनी कोरोना काळापासून गांधीनगर स्टेशनवरील एक्सप्रेस गाड्या थांबवणे बंद झाले आहे. याठिकाणी एक्सप्रेस गाड्या थांबणे येथील उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने गरजेचे असल्याचेही सांगितले.याचा पाठपुरावा करून ही यश आलेले नाही. विद्यमान खासदारांना अनेक वेळा भेटून निवेदन देऊनही प्रत्येक वेळी केवळ आश्वासने दिली आहेत असेही सांगितले. यावेळी संयोगिताराजे छत्रपती यांनी त्वरित दिल्ली येथील रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट फोनवरून संपर्क साधला. आणि याबाबतची माहिती दिली. रेल्वे अधिकाऱ्यांनी आवश्यक मागणी पत्र पाठवा त्वरित गाड्या थांबवण्याची व्यवस्था करू असे ठोस आश्वासन दिले. याचवेळी संयोगिताराजे छत्रपती यांनी माजी खा. संभाजीराजे यांचे रेल्वे प्रशासनाला देण्यासाठी पत्रही या शिष्टमंडळाकडे सुपूर्द केले.
संयोगिताराजे छत्रपती यांच्या कृतिशील तत्परतेमुळे गांधीनगरचे सर्व व्यापारी आणि संधी समाज यांनी समाधान व्यक्त केले. आणि शाहू महाराज यांना आपण मतदान करणार आणि प्रचार करून निवडूनही आणणार अशी ग्वाही दिली.
उपसरपंच विनोद हजुरानी, माजी उपसरपंच गुड्डू सचदेव, जी पी ग्रुप अध्यक्ष राहुल सचदेव, निवास तामगावे,विकी कट्यार, रोहन बुचडे, सुहास भोसले, प्रताप चंदवानी, प्रकाश तलरेजा, दीपक पोपटानी, सुनील परमानी, किशोर कामरा, धीरज टहलानी, सनी चंदवानी, आनंदा गोळ, अमित वधवा, अमित तलरेजा, जायदा इमानदार, हेमलता माने, वैशाली चौबे, सागर उदासी, कमल चंदवानी, उपस्थित होते.
