असे पाप शिवसेनेकडून कदापि घडणार नाही! : अरुण दुधवडकर
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शाहू महाराजांची उमेदवारी ही उद्धव ठाकरे यांचीच आहे असे समजून शिवसैनिकांनी प्रचारात उतरावे असे आवाहन करतानाच पक्ष आणि नेत्यांबरोबर गद्दारी केलेल्या माजी खासदाराला आता जागा दाखवा असा आदेशच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवडकर यांनी दिला.
सांगलीच्या उमेदवारीवरून कोल्हापुरात शिवसैनिकांनी प्रचार थांबवणे असल्याचे अफवा भाजपने जाणीवपूर्वक पसरवली पण असे पाप शिवसेनेकडून कदापि घडणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापुरात झालेल्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्यात गद्दारांना जागा दाखवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या मेळाव्यात बोलताना दुधवडकर म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करण्यापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराज यांना भेटून शुभेच्छा घेतल्या त्यामुळे त्यांचा प्रचार न करण्याचा प्रश्नच येत नाही मी स्वतः उमेदवार आहे असे समजून शिवसैनिकांनी कामाला लागावे असा आदेशच त्यांनी दिला आहे त्यामुळे त्यानुसार शिवसैनिकांनी प्रचारात उतरावे ज्यांनी पक्षाबरोबर आपल्याबरोबर गद्दारी केली त्या बेईमान व्यक्तींना त्यांची जागा दाखवावी
यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती यांनीही सध्या देशात संपूर्ण परिस्थिती बिघडलेली आहे देशाची वाटचाल हुकूमशाही कडे चाललेली आहे. ती रोखण्यासाठी आता इंडिया आघाडीला आणि राज्यात महाविकास आघाडीला विजय करण्याची गरज आहे असे सांगून ठाकरे घराण्याचे आणि शाहू महाराजांची गेले 115 वर्षापासून सलोख्याचे संबंध आहेत. ते आजही टिकून आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महाराणी ताराबाई यांचा विचाराचा वारसा घेऊन आज कोल्हापूरच्या जनतेने माझी उमेदवारी निश्चित केली आहे. देशात आणि राज्यात रयतेचे राज्य यावे यासाठी इंडिया आघाडीचा विजय होणे की काळाची गरज आहे यावेळी नुकतीच उमेदवारी जाहीर झालेले सत्यजित पाटील म्हणाले की बेईमानी करणाऱ्याला कोल्हापूरची जनता खाली आपटायला मागे-पुढे पाहत नाही. महाविकास आघाडीचे आम्ही दोन्ही उमेदवार विजयी झालो तर कोल्हापूरातील जनतेला चांगले दिवस येणार आहेत.
असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना उपनेते विजय देवणे, संजय पवार,माजी आ. संजय बाबा घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.
