November 2, 2025

शिरोलीतील सातपुते बंधू अद्याप फरार; पोलीस हातबल

0
20240131_135006

शिरोली : एका व्यवसायिकाकडून 80 हजार रुपये काढून घेऊन दरमहा खंडणी देण्यासाठी मारहाण करून धमकावणाऱ्यां रोहित सातपुते आणि राहुल सातपुते यांना अटक करण्यात शिरोली पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. राजकीय नेत्यांशी जवळीक असलेले हे सातपुते बंधूंना कोणाच्या आश्रयाखाली लपून बसले आहेत? असा प्रश्न पडला आहे.
इस्लामपुर आणि शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या राहुल आणि रोहित सातपुते या बंधूंचा अटक करण्यासाठी पोलीस पथक शोध घेत आहेत. ते राहत असलेल्या शिरोली माळवाडी, विलासनगर भागात दररोज पोलिसांचे पथक फिरत आहे. पण या दोघांचा कोणताच सुगावा लागत नसल्याने पोलीस हतबल झाले आहेत. हे सातपुते बंधू हातकणंगले तालुक्यातील एका राजकीय नेत्याचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे या नेत्यांकडूनच यांना लपून बसण्यासाठी आश्रय मिळाला आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. शिरोली माळवाडी, विलासनगर भागात अवैध दारू, गांजा, गुटखा, मटका, जुगार अड्डा अशा अवैध व्यवसायाबरोबरच टोळीयुद्धाचेही प्रकार नियमित घडत असतात. अनेक तरुण मुलांना वाम मार्गाला लावण्यात येत आहे. त्यामुळे हा परिसर सर्वसामान्य नागरिकांसाठी असुरक्षित आणि अशांत बनला आहे. यावर पोलिसांनी आळा घालून अवैध व्यवसाय आणि गुंडगिरी करणाऱ्याला चाप लावावा अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page