November 2, 2025

स्मॅक भवनमध्ये उद्योजक महिला मेळावा संपन्न

0
20240320_163540
शिरोली : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगाने  स्मॅक भवन मध्ये शिरोली औद्योगिक क्षेत्रामध्ये कार्यरत महिला उद्योजकांची स्मॅक मध्ये सहभागीता व त्यांची आपआपसात ओळख होण्याच्या दृष्टीने स्नेह मेळावा पार पडला.
  या स्नेह मेळाव्यात उपस्थित उद्योजक महिलांनी केंद्र व राज्य सरकार द्वारा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालया द्वारा महिला उद्योजकांसाठी असलेल्या विविध योजनांची  माहिती घेऊन त्यावर चर्चा करावी. आगामी काळामध्ये स्मॅक मध्ये सुशोभीकरण व लँडस्केपिंगचा मास्टर प्लॅन तयार करणे व आयटीआय मध्ये मुलींचा प्रवेश वाढवा व शिक्षणाच्या दृष्टीने विचार मांडले. यावेळी स्मॅक चे चेअरमन सुरेन्द्र जैन, व्हाईस चेअरमन जयदीप चौगले व खजानीस बदाम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
    स्नेह मेळाव्यामध्ये ग्नँट फौंड्री च्या संचालिका सौ. आशा सुरेन्द्र जैन, व्हर्साटाईल इंडस्ट्रीज च्या संचालिका श्रीमती बिना जनवाडकर, व्हर्साटाईल इंजिनीअर्स च्या सौ. अमृता यतीन जनवाडकर, श्रीराम फाउंड्री च्या कार्यकारी संचालिका सौ. जिया नीरज झंवर व सौ. अंकिता रोहन झंवर, यश मेटॅलिक्स च्या कार्यकारी  संचालिका सौ. राजसी आदित्य जाधव-सप्रे, सप्रे प्रिसिजन च्या पार्टनर सौ. रेणुका अजय सप्रे, सिनर्जी ग्रीन च्या कु. श्रेया सचिन शिरगावकर, पायोनियर मशीन्स च्या प्रोप्रायटर श्रीमती दीपा पत्रावळी, राठोड ज्वेलर्स च्या कु. रीवा चंद्रकांत राठोड, ॲक्युरा टेक च्या सौ. कृष्णा अमर जाधव, कनेरी इंडस्ट्रीज च्या सौ. संयोगिता श्रेणिक पाटील, धवल इंजिनिअरिंग च्या सौ. मित्रा अमेय किर्लोस्कर व सुपर-सील इंडस्ट्रीज च्या सौ. शीतल केतन नित्सुरे उपस्थित होत्या. त्यांचा स्वयम् या संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पेंटिंग्ज देऊन स्वागत करण्यात आले.
  सुरेन्द्र जैन यांनी स्मॅक, स्मॅक आयटीआय व स्मॅक क्लस्टर मधून केला जाणाऱ्या विविध कामांची माहिती दिली. तसेच  यापुढे महिन्यातून एकदा स्मॅक भवन मध्ये महिला उद्योजकांनी एकत्रित बैठक आयोजित करावी, स्मॅक भवन मध्ये महिला व अन्य विषयक सेमिनार्स,  कार्यशाळा आयोजित कराव्या आवाहन केले.
     सुरेंद्र जैन यांच्या आव्हानास सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देताना स्मॅक भवन मध्ये महिन्यातून एकदा बैठक घेऊन विविध विषयांचे उपक्रम  राबवण्याचे निश्चित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page