केशरबाई झंवर यांचे निधन, वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील प्रतितंयश झंवर उद्योग समूहाचे संस्थापक स्व. रामप्रताप झंवर यांच्या पत्नी श्रीमती केशरबाई रामप्रताप झंवर वय 80 यांचे पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कसबा बावडा येथील वैकुंठधाम स्मशान भूमीत अंत्य संस्कार करण्यात आले.
शिवाजी पार्क येथील त्यांच्या निवासस्थानापासून फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
वैकुंठधाम स्मशान भूमीत त्यांचे सुपुत्र नरेंद्र झंवर, नातू नीरज झंवर, रोहन झंवर, नितीन झंवर दिर धनराज झंवर आदीनी त्यांच्या पार्थिवास विधिपूर्वक भडांग्नी दिला. यावेळी अंत्य दर्शनासाठी व्यापार, उद्योग, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये
स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष राजू पाटील उद्योजक जयदीप चौगुले, शेखर कुसाळे, एम वाय पाटील, भरत जाधव, दीपक जाधव, श्यामसुंदर तोतला, आकाश जैन, अमोल पाटील, अतुल पाटील, संदिप पोरे मोहन कुशिरे, तसेच झंवर उद्योग समूहातील अधिकारी, कर्मचारी, कामगार वर्ग, झंवर ग्रुपशी संलग्न कंपन्याचे प्रतिनिधी आदीचा समावेश होता.
रक्षा विसर्जन उद्या दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वा होणार आहे.
