शिरोलीत वरुण सरदेसाई यांच्या हस्ते युवासेना शाखा नामफलक अनावरण
                शिरोली : शिरोली पुलाची ता. हातकणंगले येथील युवा सेना शिरोली शहर शाखेच्या नामफलकाचे अनावरण उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले
    यावेळी सरदेसाई म्हणाले या लोकसभेमध्ये हातकणंगले मतदारसंघां मध्ये खरा भगवा फडकवण्यासाठी युवकांनी सज्ज राहावे, सुज्ञ जनतेला योग्य नेतृत्व करणारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असल्याची खात्री आहे, योग्य खासदाराची निवड करून लोकसभेवर पाठवा.
    यावेळी माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले, माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण,  शिरोली शिवसेना नेते अनिल खवरे, माजी उपसरपंच सुरेश यादव, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश चव्हाण,
    युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव अविराज बलकवडे,  कोल्हापूर जिल्हा विस्तारक सतीश नरसिंगे, युवा सेना जिल्हाप्रमुख स्वप्निल मगदूम, शहर प्रमुख राजकुमार पाटील, उपशहर प्रमुख अशोक खोत, ज्येष्ठ शिवसैनिक संपत डांगे,  शिरोली युवासेना उपशहर प्रमुख प्रगटराज यादव,  सतीश रेडेकर, हरी पुजारी आदी उपस्थित होते.
                    
               
        
	            