November 2, 2025

दिल्लीतील प्रजासत्ताक कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील पाच संस्थांना मान

0
IMG-20240125-WA0277

कोल्हापूर : भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्यावतीने विकास सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाचा प्रकल्प वेगवान गतीने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील १७५१ विकास सेवा संस्थांच्या संगणकीकरणाचे कामकाज चालू आहे. दरम्यान; याआधी संगणकीकरण पूर्ण झालेल्या पाच विकास सेवा संस्थांच्या सेवा संस्थांना दिल्लीत होणाऱ्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा सन्मान मिळाला आहे. शुक्रवारी दि. २६ प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या कार्यक्रमासाठी या पाच संस्थांचे प्रतिनिधी सपत्नीक दिल्लीला रवाना झाले आहेत. या सर्वांना केडीसीसी बँकेच्यावतीने संचालक प्रताप उर्फ भैया माने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे व विभागप्रमुख अधिकाऱ्यांच्यावतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी निवड झालेल्यांमध्ये पन्हाळा तालुक्यातील पन्हाळा विकास सेवा संस्थेचे सौ. वंदना व तानाजी चंद्रकांत काटाळे, निलेवाडी ता. हातकणंगले येथील शिवाजी विकास सेवा संस्थेचे सौ. नीनाताई व प्रमोद पांडुरंग पाटील, गारगोटी ता. भुदरगड येथील मराठा विकास सेवा संस्थेचे सौ. रुपाली व रामचंद्र पांडुरंग पाटील, वडकशिवाले ता. करवीर येथील पांडुरंग विकास सेवा संस्थेचे सौ. शारदा व विलास पांडुरंग पाटील, पारदेवाडी ता. भुदरगड येथील मारुती डावरे विकास सेवा संस्थेचे सौ. वंदना व सतीश रामचंद्र पाटील यांचा समावेश आहे.

दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपल्यानंतर विकास सेवा संस्थांच्या प्रतिनिधींना दिल्ली शहराचे पर्यटन करण्यात येणार आहे. तसेच; शनिवारी दि. २७ केंद्रीय सहकार मंत्री नामदार अमितजी शहा यांच्या सहकार मंत्री निवासस्थानामध्ये भारत सरकारच्या अधिकाऱ्यांसह रात्रीच्या स्नेहभोजनाचे आयोजित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page