हालोंडीत 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यंत पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव
कोल्हापूर : हालोंडी ता हातकणंगले येथील श्री 1008 भगवान पार्श्वनाथ दिगंबर जिन मंदिर कमिटी, श्रीमद्देदेवाधिदेव 1008 सहस्त्र नाम आराधना महामहोत्सव समिती, समस्त दिगंबर जैन समाज, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद्देदेवाधिदेव 1008 भगवान श्री पाश्र्वनाथ तीर्थकर जिन मंदिर एवम मानस्तंभोपरी चतुर्मुख जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव द्वादश वर्षपूर्ती निमित्त श्रीमद्देदेवाधिदेव 1008 सहस्त्रनाम आराधना महामहोत्सवाचे आयोजन बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 ते रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2022 करण्यात आले आहे अशी माहिती लक्ष्मीसेन भटारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले बुधवार दिनांक 31 रोजी पहाटे पाच वाजता मंगलवादद्य घोष, सव्वा पाच वाजता यजमानांच्या घरी मंगल स्नान, नांदी मंगल, आणि मंदिरापर्यंत सवाद्य मिरवणूक होणार आहे. सकाळी सहा वाजता मूलनायक भगवतांचा पंचामृत अभिषेक, महा शांती मंत्र देवाज्ञा, आचार्य श्री निमंत्रण, प्रतिष्ठाचार्य निमंत्रण संध्यावंदन, इंद्र यजमान प्रतिष्ठा, कंकण बंधन, व्रत बंधन, ध्वजारोहण, मंडप उदघाटन, मंडप प्रतिष्ठा, कलश स्थापना दातारांचे हत्तीवरून मिरवणूक आणि सहस्त्रनाम विधानास प्रारंभ होणार आहे. या महोत्सव कालावधीमध्ये सकाळी सहा पासून रात्री दहा वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम आरती आणि भजन चे कार्यक्रम होणार आहेत. दररोज सकाळी दहा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता हत्तीवरून संवाद्य मिरवणूक होणार आहे. एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी हेलिकॉप्टर आणि अन्य सवाल होणार आहेत. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता गर्भसंस्कार विधी होणार आहे. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता मौजी बंधन उपनयन संस्कार विधी होणार आहे. दुपारी चार वाजता राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. तर सायंकाळी सात वाजता रथोत्सवाचा सवाल होईल 4 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते चार या कालावधीत हेलिकॉप्टरने पुष्पृष्टी होणार आहे. दररोज दुपारी चार वाजता आचार्य श्रौंचे प्रवचन होणार आहे.
या महोत्सवात सौधर्म इंद्र इंद्राणी हा मान जयप्रकाश पाटील (जे. बी.)आणि सौ ज्योती पाटील यांना, ईशान्य इंद्र इंद्राणीचा मान संजय पाटील, सौ लता पाटील यांना आणि धनपती कुबेर इंद्र इंद्राणीचा मान प्रदीप पाटील आणि सौ वर्षा पाटील यांना मिळाला आहे.
हा महा महोत्सव परमपूज गणाधिपती गणराचार्य श्री 108 कुंथुसागर जी महाराज, परमपूज्य प्रज्ञा योगी दिगंबर जैनाचार्य गुप्तिनंदी जी महाराज यांच्या आशीर्वादाने परमपूज्य आचार्य श्री सुयश गुप्तजी महाराज सहसंघ पावन सानिध्यात आणि जगद्गुरु जगतपूज्य अभिनव स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भटारक पट्टाचार्य महास्वामीजी महासंस्थान मठ कोल्हापूर यांच्या अधिनेतृत्वाखाली होत आहे. जगद्गुरु जगत पूज्य स्वस्ति श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी जी संस्थांमठ नांदणी, परमपूज्य मुनी श्री श्रमनंदीजी महाराज, परमपूज्य मुनीश्री तत्वार्थनंदी जी महाराज, परमपूज्य क्षल्लक श्री जिनदत्त सागर जी महाराज यांच्या पावन उपस्थितीत होत आहे. दररोज जलकुंभ मिरवणूक, पंचामृत अभिषेक, अन्नदातारांची हत्तीवरून मिरवणूक, सहस्त्रनाम विधान, हत्तीवरून जिनशास्त्र आणि धर्मध्वज मिरवणूक धनपती कुबेरा द्वारे समवशरणावरती रत्नवृष्टी, असे अनेक विविध धार्मिक विधी प्रतिष्ठाचार्य संजीव जंबू उपाध्ये, प्रतिष्ठाचार्य प्रशांत आदिनाय उपाध्ये, स्थानिक पंडित अनिल श्रीपाल उपाध्ये, प्रमोद दीपक उपाध्ये यांच्यासह अन्यविधानाचार्याच्या कडून होणार आहेत.
पत्रकार परिषदेस संयोजन समितीचे जे. बी. पाटील, सुनिल पाटील, प्रदीप पाटील, बाबासो घुमाई, माणिक घुमाई अशोक पाटील, तात्यासो पाटील, राजेंद्र पाटील महावीर पाटील, अमोल पाटील गुंडा पाटील, धन्यकुमार मंडपे, कुलभूषण पाटील काकासो पाटील, जितेंद्र पाटील.उपस्थित होते.
