दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून मित्राला केले गंभीर जखमी
शिरोली / प्रतिनिधी
शिरोली पुलाची येथे दारूच्या नशेत डोक्यात दगड घालून एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले जखमीचे नाव तानाजी बाळू मोहिते वय ४५ रा. यादववाडी शिरोली पुलाची असे असून ही घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली .
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शिरोली पुलाची येथील के एम टी पेट्रोल पंम्पा शेजारी असणाऱ्या डायमंड दारू दुकानात जखमी तानाजी मोहिते व पांडूरंग गणपती सूर्यवंशी हे दोघे दारू पित असताना वाद झाला हा वाद विकोपाला गेला त्यात सूर्यवंशी याने मोहिते याच्या डोक्यात दगड घातला त्यात मोहिते गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले . पोलिसांनी सुर्यवंशी यास ताब्यात घेतले पण मोहिते यानी पोलिसात तक्रार देण्यास नकार दिला त्यामुळे या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली नाही.
