November 2, 2025

पक्ष प्रवेशामुळे गडहिंग्लज मध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली : अजित पवार

0
IMG-20240110-WA0341

मुंबई : गडहिंग्लज शहरातील जनता दल आणि इतर पक्षाच्या पदाधिकारी आणि नेतेमंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि गडहिंग्लज शहरासह तालुक्यातील आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
गडहिंग्लज शहर आणि तालुक्यातील जनता दलासह इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या सर्वांचे स्वागत उपमुख्यमंत्री पवार व वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या देवगिरी या सरकारी निवासस्थानावर हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, शिवाजीराव गर्जे, लतीफ तांबोळी, बुऱ्हाण नायकवडी आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये जनता दलाचे माजी नगराध्यक्ष राजू खणगावे, गडहिंग्लज नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर, गडहिंग्लज नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष उदय पाटील, करंबळीचे लोकनियुक्त युवा सरपंच अनुप पाटील, गडहिंग्लज नगर परिषदेचे शिक्षण मंडळाचे सदस्य सतीश ईटी, उद्योजक विनोद बिलावल, उद्योजक अभिषेक पाटील, लिंगनूर येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर घुगरे, करंबळी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील, गडहिंग्लज येथील सामाजिक कार्यकर्ते ताहीरभाई कोचरगी गुरुप्रसाद नूलकर, अथर्व मिसाळ, राघवेंद्र तेलंग आदींचा समावेश आहे.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, तुमचे जेही काही प्रश्न असतील, ते सर्व सोडवू. राष्ट्रवादी काँग्रेस एक परिवार आहे. पक्षातील मूळचे सहकारी आणि तुम्हा सर्वांचा एकोपा ठेवून एकत्रितपणे पुढे जाऊया. सगळ्यांनी संघटनात्मक काम करूया.
वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज शहरासह तालुक्यातील नेतेमंडळींच्या या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची गडहिंग्लज शहर, तालुका आणि जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. या सर्वांचा योग्य तो मान-सन्मान ठेवू. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे तरुणांवर गारुड असणारे लोकप्रिय नेतृत्व आहे. लवकरच गडहिंग्लजमध्ये या सर्वांच्या पक्षप्रवेशाचा मोठा जाहीर कार्यक्रम ठेवू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page