चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी संजय शेटे : राजू पाटील, दुगे उपाध्यक्ष
कोल्हापूर : कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या अध्यक्षपदी संजय शेटे यांची सलग दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी राजू पाटील व धनंजय दुग्गे यांची निवड झाली.
मानद सचिवपदी जयेश ओसवाल, वैभव सावर्डेकर, प्रशांत शिंदे व अजित कोठारी यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी हरीभाई पटेल यांची निवड करण्यात आली.
कॉमर्सची निवडणूक बिनविरोध झाली. कोल्हापूर चेंबरच्या कार्यालयात सर्व नवनिर्वाचीत कार्यकारी सदस्यांची सभा बोलविण्यात आली होती. यामधून अध्यक्षपदी – संजय धनपाल शेटे यांची सलग दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी – राजू तुकाराम पाटील व धनंजय सुरेश दुग्गे, मानद सचिवपदी – जयेश मोहनलाल ओसवाल, वैभव निळकंठ सावर्डेकर, प्रशांत शशिकांत शिंदे व अजित सोहनलाल कोठारी यांची निवड करण्यात आली. खजिनदारपदी– हरीभाई मावजीभाई पटेल यांची निवड करण्यात आली. अॅड. दिपक देसाई यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
तसेच, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या २०२४-२०२९ या पंचवार्षिक कार्यकारी मंडळामध्ये इंद्रजित शिवाजीराव चव्हाण, गोरख शंकर माळी, धनाजी दत्तात्रय पाटील, संग्राम विष्णु पाटील, सीमा रविंद्र जोशी, सीमा संजय शहा, अनिल वसंतराव धडाम, अशोककुमार रामू बोरगांवे, धैर्यशील हिंदुराव पाटील, बबन बाबुराव महाजन, रणजित शांतीलाल पारेख, अतुल आनंदराव पाटील यांची स्विकृत सदस्य म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
नवनिर्वाचीत कार्यकारी मंडळातून पदाधिकारी व स्विकृत संचालक निवड करण्यासाठी आमदार जयश्री जाधव, माजी अध्यक्ष आनंद माने, ललित गांधी, प्रदीप कापडीया, शिवराज जगदाळे व दिलीप मोहिते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
