खेळाडूंसाठी राज्य शासनाची ‘मिशन लक्ष्यवेध’ योजना
मुंबई : राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिक पदकांचे ध्येय गाठावे यासाठी राज्याच्या मंत्रिमंडळाने ‘मिशन लक्ष्यवेध’ योजना सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
खेळाडूंना ऑलिम्पिक पदक मिळवण्यासाठी नियोजनबद्द प्रयत्न करण्यासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘मिशन लक्ष्यवेध’ ही योजना सुरु करण्यात येणार असून या महत्वाकांक्षी योजनेलामंत्री मंडळाने मान्यता दिली आहे.
१२ प्रकारच्या खेळांकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या २४० खेळाडूंसाठी राज्यातील सहा ठिकाणी राज्यस्तरीय हाय परफॉर्मन्स सेंटर, राष्ट्रीय दर्जाच्या ७४० खेळाडूंसाठी ३७ विभागीय स्पोर्टस एक्सलन्स सेंटर आणि राज्य दर्जाच्या २ हजार ७६० खेळाडूंसाठी जिल्हास्तरावर १३८ जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
याठिकाणी पायाभूत सुविधा व क्रीडा साहित्य देण्यासह सरावासाठी क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच स्पोर्टस सायन्स सेंटर, करिअर मार्गदर्शन, क्षमता विकास व खेळाडूंची निवड आणि प्रशिक्षण यावर देखील भर देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी १६० कोटी ४६ लाख ३५ हजार रुपये इतका खर्च अपेक्षित जिल्हा वार्षिक योजनेतर्गत क्रीडा विभागास दिल्या जाणाऱ्या एकूण तरतूदीच्या १० टक्के रक्कम या योजनेवर खर्च करण्यास मान्यतादिली आहे.
