कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ ला साहित्य अकादमी पुरस्कार
कोल्हापूर : यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोल्हापुरातील लेखक कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला जाहीर झाला आहे. देशातील २४ भाषेत प्रत्येकी एक पुरस्कार जाहीर केला जातो. या पुरस्कारासोबत १ लाख रुपये देखील दिले जातात. या पुरस्काराचं वितरण १२ मार्च रोजी करण्यात येणार आहे.
साहित्य अकादमीकडून आज विविध पुरस्कारांची घोषणा केली आहे. साहित्य अकादमी कडून देशातील २४ भाषांमध्ये लेखन करणाऱ्या लेखकांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यंदाचा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोल्हापुरातील कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीला जाहीर झाला आहे.
अभिराम भडकमकर, डॉ संतोष खेडलेकर आणि श्रीमती अनुराधा पाटील या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता. साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, शाल आणि रुपये एक लाख रोख रक्कम आणि ताम्रपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.
कृष्णात खोत प्रतिक्रिया देताना म्हणाले की पर्यावरणाबरोबर चाललेल्या मानवाच्या युद्धात मानवाचा पराभव अटळ आहे. विस्थापितांच्या आवाजची नोंद रिंगाण या कादंबरीच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. या पुरस्कारामुळं भारतीय पातळीवरचा एक साहित्यिक म्हणून ओळख झाली. शेसव्वाशे घरांच्या निकमवाडी सारख्या वाडीतून देशाच्या राजधानीत आपल्या लेखणीची नाममुद्रा उमटवणारा लेखक या पुरस्कारामुळं होता आलंय.
