रस्त्यावर चिकट तेल सांडल्याने वाहनधारकांची तारांबळ
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या समोरच भाऊंसिंगजी रोड यामुख्य रस्त्यावर अत्यंत चिकट सरकी तेलाचे डबे सांडले यामुळे रस्त्यावर निसरडे झाले. रस्त्यावर वर्दळ सुरु असताना अनेक वाहने यावर घसरू लागली. त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली.
आज दुपारी घडलेल्या या प्रकारमुळे या ठिकाणी काही दुचाकी ही घसरून पडल्या. हो मनसेचे विजय करजगार आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी महापालिकेच्या अग्निशामक दलाला कळवले तसेच जनसंपर्क अधिकारी मोहन यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्या ठिकाणी त्वरित अग्निशामक दलाचे पथक आले. त्या ठिकाणी फायर ऑफीसर कांता बांदेकर सह योगेश जाधव , विजय सांवत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करून पाण न मारता माती टाकून रस्त्यावरील चिकटपणा आणि निसरडे कमी केले. आणि होणारी संभाव्य अपघात टाळले. आणि वाहतूक सुरळीत झाली. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांतून सुटकेचा निश्वास सोडत समाधान व्यक्त केले.
